जिल्ह्या परिषदांमध्ये 19,460 पदाची मेघाभरती


जिल्हा परिषद भरती 2023 : राज्यातील जिल्हा परिषदेमधील (ZP Bharti 2023) विविध रिक्त पदांसाठी भरतीप्रकिया सुरु

ZP Bharti 2023 : राज्यातील विविध जिल्हा परिषद मध्ये गट 'क' संवर्गातील पदे भरण्यासाठी सुरुवात झाली असून, गट 'क' संवर्गातील विविध प्रवर्गाच्या हजारो रिक्त जागांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील जिल्हा परिषद भरती 2023 ही IBPS मार्फत पार पडणार आहेत. भरती प्रक्रिया 5 ऑगस्ट 2023 पासून सुरू होणार आहे.

भरतीसाठी रिक्त पदांचा तपशील, पदांकरता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर माहिती प्रत्येक
जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

भरती प्रक्रिया 5 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.


🔥ONLINE APPLICATION 👉CLICK HERE


जिल्हा परिषद भरती 2023 पदांचा तपशील:
आरोग्य पर्यवेक्षक,आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ग्रा. पा. पु.), कनिष्ठ Subject (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक,कनिष्ठ यांत्रिकी,लेखाधिकारी, कनिष्ठ सहायक (लिपिक), कनिष्ठ सहाय्यक लेखा,जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक ,प्रयोगशाळा तंत्रज्ञान, यांत्रिकी, रिगमन , वरिष्ठ सहाय्यक -लिपीक ,वरिष्ठ सहाय्यक , विस्तार अधिकारी कृषी ,विस्तार अधिकारी शिक्षण , विस्तार अधिकारी , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ( आणि लघुपाटबंधारे)

जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 आयबीपीएस एजन्सी मार्फत ..
राज्यातील जिल्हा परिषदेमधील भरती IBPS एजन्सी मार्फत भरती प्रक्रिया पार पडणार आहे. परीक्षेसाठी शासनाने संवर्गनिहाय परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित केल्यामुळे आता परीक्षेचा पेपर काढणे आणि पेपर तपासणी तसेच इतर कार्यवाही IBPS एजन्सी मार्फत होणार आहे.
प्रत्येक प्रवर्गासाठी स्वतंत्र परीक्षा स्वतंत्र दिवशी घेण्यात येईल. यामध्ये संवर्गनिहाय मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापक, गणित, तांत्रिक प्रश्न , प्रश्नपत्रिका , काठिण्य पातळी आणि परीक्षेची वेळ निश्चित केली जाईल.

जिल्हा परिषद भरतीसाठी परीक्षा शुल्क:
खुल्या वर्गासाठी - 1000/-
राखीव वर्गासाठी 900 /-

वेतन श्रेणी - 19,900 ते 1,12,400/-


जिल्ह्या परिषदांमध्ये 19,460 पदाची मेघाभरती 

महाजन यांची माहिती

मुंबई : ग्रामविकास विभागांतर्गत  राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत  गट-क मधील सरळसेवेची आरोग्य  विभागाकडील 100 टक्के व इतर विभागांकडील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19 हजार 460 इतकी पदे सरळसेवेने भरण्याबाबतची प्रक्रिया शनिवार (आज) पासूनच सुरू होणार आहे. या भरतीची जाहिरात शनिवार, 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.


मंत्री महाजन म्हणाले, मार्च, 2019 मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान, लोकसभा व " विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमी व इतर विविध कारणांमुळे परीक्षा होऊ शकली नाही. यानंतर शासनाच्या  विविध विभागांद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत ही मेगाभरती करण्यात येत आहे. यामध्ये ५ ऑगस्ट 2023 ते 25 ऑगस्ट 2023 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येतील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ज्या जिल्हा परिषदेमध्ये 


अर्ज करावयाचा आहे, त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन 25 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. जाहिरातींच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांकरता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती आदी बाबी संबंधित जिल्हा परिषदांच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार असल्याचे


मंत्री महाजन यांनी सांगितले. राज्यातील. सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरता अर्ज करावा. अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया आयबीपीएस कंपनीमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे या परीक्षेमध्ये अत्यंत पारदर्शकता राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषाला कोणत्याही उमेदवाराने बळी पडू नये, अशी विनंती आहे, असेही म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या