जिल्हा परिषद, बीड यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण 568 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण 568 जागा
आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य परिचारिका/ आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ बांधकाम) ग्रामीण पाणी पुरवठा), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, जोडारी, मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, लघुलेखक (निम्न श्रेणी), विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (सांख्यिकी) आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघुपाटबंधारे) पदांच्या जागा.
🔥अधिक माहितीसाठी👉CLICK HERE
परीक्षा शुल्क :
1 .खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रू. 1000/-
2मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रू. 900/-
3.अनाथ उमेदवारांसाठी रू. 900/-
4. माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील. २.५ फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्विकारले जाईल.
5. परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ऑनलाईन चलनाची (पावती) प्रत ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत कागदपत्रांच्या तपासणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील.
6.उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा
अर्ज करण्यासाठीची महत्त्वाची सूचना :
अ) राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे..
ब) भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र हे संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास ही जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.
अर्ज भरणे व सादर करणेबाबत आवश्यक सूचना
- उमेदवारांनीअर्जभरण्यापूर्वी https://ibsonline.ibps.in या लिंकवर जाऊन जाहिरात सविस्तर अभ्यासावी.
- ऑनलाईन फी भरणेसाठी दि. 25/08/2023 वेळ 23.59 पर्यंत मुदत राहील
- अर्जात हेतूपुरस्सर खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात बदल करणे किंवा पाठविलेल्या दाखल्यांच्या प्रतीतील नोंदीत अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले वा बनावट दाखले सादर करणे, परीक्षा कक्षातील गैरवर्तन, परीक्षेचे वेळी नक्कल (copy) करणे, वशीला लावण्याचा प्रयत्न करणे यासारखे अथवा परीक्षा कक्षाचे बाहेर अथवा परीक्षेनंतरही गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना गुण कमी करणे, विशिष्ट किंवा सर्व परीक्षांना वा निवडींना अपात्र ठरविणे इत्यादी यापैकी प्रकरणपरत्वे योग्य त्या शिक्षा करणेचा तसेच प्रचलित कायदा व नियमांचे अनुषंगाने योग्य ती कारवाई करणेचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांना राहतील. तसेच विहीत केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणारा अथवा गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवड होण्यास अपात्र ठरेल. तसेच निवड झाल्यानंतर देखीलसेवा समाप्तीस पात्र ठरेल.
- वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक (एस.एस.सी) परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, वय व अधिवासाबाबत शासनाकडील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरणेत येईल.
- शैक्षणिक अर्हतेसंदर्भात आवश्यक माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी. संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा शैक्षणिक अर्हता धारण केल्याचा दिनांक समजणेत येईल व त्या आधारे उमेदवाराची पात्रता ठरविणेत येईल.
- गुणांऐवजी श्रेणी पध्दत असल्यास कागदपत्र पडताळणीचे वेळी उमेदवारांनी गुणपत्रकासोबत श्रेणीची (Grade) यादी सादर करावी.
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 5 ते 25 ऑगस्ट 2023 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक
परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. परीक्षेचे प्रवेशपत्र हे परीक्षेपुर्वी 7 दिवस आधी उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठीची स्वतंत्र लिंक या https://zpbeed.gov.in/ बीड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल
0 टिप्पण्या