रोजगार हमी मधून राबविली जाणार ही योजना.
केवळ विहीर दिली म्हणजे झाले असे देखील नाही. विहीर असेल आणि त्या विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी पंपच नसेल तर शेतकरी कसा लखपती होणार.
त्यामुळे विहीर खोदकाम पूर्ण झाल्यावर विहिरीतील पाणी उपसा उपसा करण्यासाठी शेतकरी बांधवाना पंप शक्यतो सोलर पंप देण्यात यावा असा देखील उल्लेख या जी आरमध्ये करण्यात आलेला आहे.
शेतकरी लखपती व्हावा यासाठी त्यांना तुषार ठिबक सिंचन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अस्तित्वातील विहिरीपासून ५०० मीटर अंतरावर विहीर खोदण्याच्या नियमात देखील बदल करण्यात आला असून आता १५० मीटर करण्यात आलेली आहे. परंतु हा नियम ठराविक बाबींसाठीच लागू असणार आहे.
योजनेचा उद्देश :
रोजगार हमी योजनेतून मागेल त्यांना विहीर मिळणार आहे. विहिरी संदर्भातील नियम, अटी, निधी, लाभार्थी पात्रता, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत...
शेती करत असतांना शेतीसाठी लागणारा अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे पाणी होय आणि त्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे विहीर.
आर्थिक अडचणीमुळे अनेक शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये विहीर खोदकाम करू शकत नाही परिणामी पाण्याअभावी अशा शेतकरी बांधवांचे उत्पन्न कमी होते.
त्यामुळे शासकीय अनुदानावर विहीर खोदली तर नक्कीच शेतकऱ्यांना सहाय्य मिळणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये बदल करण्यात आला असून त्यात वैयक्तिक लाभावर अधिक भर देण्यात आलेला आहे.
मनरेगा योजना हि फक्त रोजगार देणारी योजना नसून विकासात भर घालणारी योजना आहे.
मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे ठरविलेले आहे.
योजने ची पात्रता :
> लाभार्थ्यांकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे. म्हणजेच 40 आर किंवा ज्याला आपण एक एकर असे देखील म्हणू शकतो तर तेवढी जमीन असावी.
> ज्या ठिकाणी विहीर खोदकाम करायचे आहे. त्या ठिकाणपासून ५०० मीटर विहीर नसावी. > दोन सिंचन विहिरीमधील १५० मीटरअन्तरासाठी खालील अटी लागू करण्यात आलेल्या आहेत.
• दोन विहिरीमधील किमान 150 मीटर > अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येणार नाही.
• लाभार्थीच्या सातबारावर अगोरच विहीर > असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच त्यांच्या ७ / १२वर विहिरीची नोंद नसवी.
> लाभार्थीकडे ऑनलाईन एकूण जमिनीचा दाखला असावा.
> लाभार्थी एकापेक्षा जास्त असेल तर अशावेळी संयुक्तपणे ते विहीर अनुदान योजनेचा लाभ घेवू शकतात मात्र त्यासाठी एकूण सलग जमिनीचे क्षेत्र ०.४० पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
अशावेळी संयुक्तपणे ते विहीर अनुदान योजनेचा लाभ घेवू शकतात मात्र त्यासाठीयेकूण सलग जमिनीचे क्षेत्र ०.४० पेक्षा जास्तअसणे गरजेचे आहे.
> सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या विहीर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
लाभार्थी निवड :
- अनुसूचित जात
- अनुसूचित जमाती.
- भटक्या जमाती
- नीरधीसूचित जमाती.
- दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी.
- स्त्री कर्ता असलेले कुटुंबे.
- शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे.
- जमिनी सुधारक सुधारण्याचे लाभार्थी. > इंदिरा आवास योजने खालील लाभार्थी.
- अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत > वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम2006 खालील लाभार्थी.
- सीमांत शेतकरी म्हणजेच ज्यांच्याकडे अडीच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
- अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे पाचएकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
अर्जासोबत लागणारी कागदपत्रे.
७/१२ उतारा जो कि ऑनलाईन असावा.
८ अ म्हणजेच एकूण जमिनीचा दाखला तो देखील ऑनलाईन असावा.
जॉब कार्ड झेरॉक्स प्रत.
एखाद्या विहीर असेल परंतु ती जर सामुदायिक असेल तर अशावेळी सामोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांचे कराकररपत्र.
0 टिप्पण्या