पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी मोफत. | Free for pre-police recruitment training 2023


पोलीस भरती प्रशिक्षण मोफत आजच करा अर्ज.

    महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपुर मार्फत राज्यातील नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण 2023महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 12 वी उत्तीर्ण असणान्या इच्छुक विद्याथ्र्यांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे.


योजनेचे स्वरुप

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी पात्र नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जातीव भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत ऑफलाईन प्रशिक्षण देण्यात येते.

प्रशिक्षणाचा कालावधी -4 महिनेकरिता

विद्यावेतन- रु.6000/-  प्रतीउमेदवार(ऑफलाईनप्रशिक्षणाकरिता)

प्रशिक्षणाची संख्या-300- नागपूर छत्रपती संभाजी नगर 300


🔥 ऑनलाईन अर्ज 👉CLICK HERE


अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता:

1. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी. 2. विद्यार्थी हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गयापैकी असावा/ असावी.

3. विद्यार्थी हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी

4. विद्यार्थी हा 12 वी उत्तीर्ण असावा/ असावी. 5. शारिरीक क्षमता विद्यार्थी प्रशिक्षणाकरिता पात्र झाल्यास खालील बाबींची पुर्तता करण्यातयावी अन्यथा योजनेचा लाभ घेता येणार नाही.

उंची कमीत कमी 165 से.मी (पुरुष) कमीत कमी 155 से.मी (महिला)


छाती :- कमीत कमी 79 से.मी (दीर्घ श्वास घेतल्यानंतर 84 से.मी) केवळ पुरुषांकरिताव. 


🔥JOIN WHATSAPP GROUP👉CLICK HERE


ब. अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रे:

1. आधार कार्ड

2. रहिवासी दाखला 3. जातीचा प्रमाणपत्र

4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

5. 12 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र 6. बँकेचे तपशील (बँक पासबुक किंवा रद्द चेक)


क. अर्ज कसा करावा.

1. महाज्योती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधीलपोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

2. अर्जासोबत व मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कैन करूनअपलोड करावे.


सामाजिक प्रवर्गनिहाय विभागणी :-

अ.क्र.      सामाजिक प्रर्वग                            टक्केवारी

1.           इतर मागास वर्ग (OBC)                   59%  

2.         निरधीसुचीत जमाती अ (VJ-A ) -        10% 

3 .          भटक्या जमाती (NT-B).                   8%

4            भटक्या जमातीक (NTC).                11%

5.           भटक्या जमाती ड (NT-D).              6% 

6.           विशेष मागास प्रवर्ग (SBC).            6%

                         एकूण.                               100%


ड. आरक्षण:-

1. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 30% जागामहिलांसाठी आरक्षित आहे. 

2. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.


🔥 संपुर्ण जाहिरात 👉CLICK HERE


इ. प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती :

1. अर्ज करण्याचा अंतिम दि.27/08/2023 आहे.

2. विहित नमुन्यामध्ये कागदपत्रासहित अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची छाननी परीक्षा घेऊन प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.

3. प्रशिक्षणाकरिता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास रुजु होतील त्या दिवसापासून त्यांना रु.6000/- प्रति महिना या दराने विद्यावेतन लागू होईल. प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्या उमेदवारांनाच विद्यावेतन देण्यात येईल.

4. विद्यार्थ्यांनी विद्यावेतन जमा करण्यासाठी आधार क्रमांकाशी संलग्न बँक खाते देणे अनिवार्य आहे.

5. महाज्योतीकडे अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सारथी, पुणे या संस्थेकडील याच परीक्षेचा प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच महाज्योती कडील सदर प्रशिक्षणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रशिक्षण योजनेत अधिछात्रवृत्तीचा लाभ धारक नसावा. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा दुबार लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास विद्यार्थ्यांविरुद्ध नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

6. सदर प्रशिक्षणासाठी अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांने वरील अटी व शर्तीचा भंग केल्याचे तसेच चुकीची किंवा खोटी कागदपत्रे / माहिती सादर केल्यास त्यांचेवर झालेल्या प्रशिक्षण खर्चाची त्यांचेकडुन वसुली करण्यात येईल व यापुढे महाज्योतीच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यास ते पात्र असणार नाही.

7. नमुद निकषांची पूर्तता न करणाऱ्या, अपूर्ण अर्ज सादर करण्याऱ्या किंवा अर्जासोबत कागदपत्रे न सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज बाद करण्यात येईल.

8. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.

9. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. 10. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर पुढील क्रमांकावर संपर्क करावा : 8956775376/77/78/79/80.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या