प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे कार्यालय " वनभवन", रामगिरी रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर - ४४०००१
वन विभागातील वनरक्षक (गट क) भरती प्रक्रिया सन 2023
दिनांक ८/६/२०२३
वनविभागातील वनरक्षक (गट क) पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने याwww.mahaforest.gov.inसंकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळाववरील लिंकवर विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
अधिक माहितीसाठी
⏬
1 टिप्पण्या
🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा